Follow Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका ,जाहिराती,अभ्यासक्रम,विषयानुसार उत्कृष्ट नोट्स,चालु घडामोडी मिळण्याचे एकमेव संकेतस्थळ...

शुक्रवार, 4 जनवरी 2019

'द्रोणाचार्य' रमाकांत आचरेकर यांचं निधन

 सचिन तेंडुलकरचे गुरू 'द्रोणाचार्य' रमाकांत आचरेकर यांचं निधन

✍आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सचिन तेंडुलकर नावाचा हिरा देणारे आधुनिक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झाले

✍आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेलं रत्न सचिन तेंडुलकर नावाच्या हिऱ्याला पैलू पाडणारे गुरू रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं.ते 87 वर्षांचे होते.

✍आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडूंना घडवले.

✍त्यांनी घडवलेल्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला भरभरून दिले. त्यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.

🔴 रमाकांत आचरेकर यांच्या विषयी :-

✍1932 सालचा त्यांचा जन्म. त्यांनी 1943 साली क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

✍1945 मध्ये त्यांनी न्यू हिंद स्पोर्ट्स क्लबकडून क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

✍त्यांनी यंग महाराष्ट्रा एकादश. गुल मोहर मिल्स आणि मुंबई पोर्ट संघांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी केवळ एक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले

✍1963-64 साली त्यांनी ऑल इंडिया स्टेट बँकचे प्रतिनिधित्व करताना हैदराबादविरुद्ध सामना खेळला होता

Wikipedia

खोज नतीजे

Comments System