Follow Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्रश्नपत्रिका ,जाहिराती,अभ्यासक्रम,विषयानुसार उत्कृष्ट नोट्स,चालु घडामोडी मिळण्याचे एकमेव संकेतस्थळ...

चालू गडामोडी 1

  • 🔹अंडर १९ आशिया कप, श्रीलंकेवर मात करत भारताने पटकावले विजेतेपद

  • भारताने श्रीलंकेवर मात करत अंडर १९ आशिया चषकावर नाव कोरले आहे. भारताचा कर्णधार अभिषेक शर्माच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने लंकेवर ३४ धावांनी विजय मिळवला असून या कामगिरीसाठी शर्माला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.
  • श्रीलंकेत अंडर-१९ आशिया चषक पार पडले. शुक्रवारी संध्याकाळी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ८ गडी गमावत २७३ धावा केल्या. हिमांशू राणाने ७१ तर शुभम गिलने ७० धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. कर्णधार अभिषेक शर्माने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन २९ धावांची खेळी केली. सलमान खान २६ धावांवर बाद झाला त्यावेळी भारत ५ बाद २४४ धावांवर होता. मात्र त्यानंतर प्रियम गर्ग आणि हेत पटेल हे दोघेही लागोपाठ बाद झाल्याने भारताची अवस्था ७ बाद २४५ अशी झाली. तळाचा फलंदाज कमलेश नागरकोटीने २३ धावांची महत्त्वाची खेळी करत भारताला २७३ धावांची मजल गाठून दिली.
  • घरच्या मैदानात खेळणा-या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात फारशी चांगली नव्हती. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेची सलामीची जोडी संघाच्या २७ धावा झाल्या असतानाच फोडली. मात्र त्यानंतर रेवेन केलीने ६२ आणि तिस-या क्रमांकावर आलेल्या हासिथ बोयागोडाने ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी जमली असताना कर्णधार अभिषेक शर्माने भारताला मोठे यश मिळवून दिले. शर्माने बोयागोडाला बाद करत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. यानंतर शर्माने अर्धशतक ठोकणा-या कामिंदू मेडिंसचीही विकेट घेतली. शर्माने ३७ धावांमध्ये ४ विकेट घेतल्या. तर राहुल चाहरने तीन विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांच्या अचूक मा-यापुढे श्रीलंकेचा संघ २३९ धावांवर गारद झाला. सामन्यात २९ धावा आणि ४ विकेट घेणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. तर हिमांशू राणाला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.


  • 🔹ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन
  • ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी संध्याकाळी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. बेनवाडा, येळकोट, आडवाटा, वारसदार हे त्यांचे कथासंग्रह वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. दलित साहित्यात त्यांचे मोलाचे योगदान असून आंबेडकर चळवळीतही ते सक्रीय होते.
  • वामन होवाळ यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. होवाळ यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी ठाणे आणि नंतर सिद्धार्थ महाविद्यालयात घेतले. शालेय जीवनापासून त्यांनी कथालेखन केले. त्यांची पहिली कथा पुण्यातील एका मासिकात छापून आली. यानंतर त्यांच्या विविध मासिकांमधून ३५० हून अधिक कथा प्रसिद्ध झाल्या.
  • दलित- शोषितांचे विदारक जग मांडत असताना आणि समाज परिवर्तनासाठी झटत असतानाही होवाळ यांचे लेखन हे प्रचारकी नसल्याचे नेहमीच सांगितले जायचे. दलित साहित्याला वामन होवाळ यांच्या लेखणीने नवी उंची गाठून दिली. होवाळ यांच्या कथा मराठी भाषेसोबतच अन्य भाषांमध्ये गाजल्या. हिंदी, इंग्रजीपासून ते अगदी उर्दू, कन्नड आणि फ्रेंच भाषेतही त्यांच्या कथा अनुवादित झाल्या आहेत.
  • होवाळ यांचे बेनवाड, येळकोट, वारसदार, वाटा आडवाटा आणि ऑडिट हे कथासंग्रह प्रसिद्ध होते. यातील तीन कथासंग्रहांना पुरस्कारही मिळाला होता. यात राज्य सरकारच्या पुरस्काराचा समावेश आहे. ‘आमची कविता’ या कविता संग्रहाचेही त्यांने संपादन केले होते.
  • शुक्रवारी संध्याकाळी विक्रोळी येथील राहत्या घरी वामन होवाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वामन होवाळ यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. होवाळ यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

  • 🔹महाराष्ट्रातील ४.१५ लाख गरीब कुटुंबे धुरापासून मुक्त

  • गरिबाच्या स्वयंपाकघरात नि:शुल्क एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ४.१५ लाख कुटुंबीयांची स्वयंपाकघरे धूररहित झाली आहेत.
  • पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने मंत्रालयाने धडक कार्यक्रम हाती घेतला असून देशभरातील दारिद्र रेषेखाली राहणाऱ्या ५ कोटी कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत सर्वाधिक अर्ज पुणे येथून आले, पण कनेक्शन मिळण्यात लातूर आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील १४ लाख गरीब कुटुंबांनी अर्ज केले. पैकी १०.८६ लाख अर्ज मंजूर करण्यात आले. यापैकी ४ लाख १५ हजार कुटुंबाकडे गॅस कनेक्शन पोहोचवून देण्यात आले.
  • सर्वाधिक अर्ज पुणे (७८,७५७), सोलापूर (७६,७४४), नांदेड (७२,८५९), नाशिक (७१,३७३) आणि अहमदनगर (७०,०५२) या जिल्ह्यातील लोकांनी केले. अर्जाच्या तुलनेत सर्वाधिक गॅस कनेक्शन लातूर (२९,४४३), सांगली (१७,७८७), अहमदनगर (१७,४६६), धुळे (१७,६३२) आणि पुणे (१७४६६) या जिल्ह्यातील लोकांना देण्यात आले. तसेच नागपूर येथे ३१,७२६ लोकांनी अर्ज भरले. पण १२,२१८ कुटुंबाला कनेक्शन देण्यात आले तर औरंगाबाद येथे ३७,१८८ अर्जापैकी ११,८०७ लोकांना कनेक्शन मिळाले. मंजूर झालेल्या अर्जदारास काही महिन्यातच कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
  • घरगुती गॅस कनेक्शनमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत ८१ टक्के कुटुंबाकडे घरगुती गॅस कनेक्शन आहे. एकूण २.३८ कोटी कुटुंबांपैकी २.०९ कोटी कुटंब गॅसवर स्वयंपाक करतात.
  • ६०० जिल्हा नोडल अधिकारी
  • संपूर्ण देशात जिल्हास्तरावर ६०० नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना या योजनेचा कणा समजला जात आहे. अधिकाऱ्यानुसार ते फिल्ड काम करतात. ते अर्जदार व गॅस वितरणादरम्यान समन्वयाचे काम करताना योजनेच्या अन्य पैलूंवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.

  • 🔹दक्षिण सॅन फ्रान्सिस्को शहराचा महापौर बनला भारतीय अभियंता

  • वॉशिंग्टन :
  • अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात स्थित दक्षिण सॅन फ्रान्सिस्को सिटीत भारतीय अमेरिकन अभियंता महापौर म्हणून निवडून आला आहे. आयआयटी चेन्नईचे विद्यार्थी असणारे प्रदीप गुप्ता यांनी शहराच्या महापौरपदाची शपथ घेतली आहे.
  • कोणत्याही अमेरिकन शहरासाठी महापौर म्हणून निवडून आलेले ते दुसरे भारतीय व्यक्ती आहेत. मी माजी महापौर मार्क एड्डिगो यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेले काम सुरू ठेवेन, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्यचे गुप्ता यांनी म्हटले. 31 डिसेंबर 2012 रोजी एक वर्षासाठी दक्षिण सॅन फ्रान्सिस्को नगर परिषदेत गुप्ता यांना नियुक्त करण्यात आले होते. नगर परिषदेसाठी त्यांच्या नियुक्तीआधी ते 3 वर्षांसाठी दक्षिण सॅन फ्रान्सिस्को नियोजन आयोगात अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गुप्ता यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डॉक्टरेट केले आहे. अमेरिका आणि इतर देशांमध्ये इलेक्ट्रिकल यूटिलिटी क्षेत्रासोबत गुप्ता यांची 30 वर्षांपेक्षा अधिक काळाची कारकीर्द राहिली आहे.
  • याआधी ते शहराचे उपमहापौर देखील राहिले आहेत.
  • 🔹शाळाबाह्य मुलांच्या पालकांना निवडणूक लढवण्यास बंदी!
  • ‘एनसीपीसीआर’ची राज्यांना निवडणूक नियमांत दुरुस्ती करण्याची विनंती
  • यापुढे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला पाल्याला शाळेत दाखल न केल्यास ‘स्थानिक स्वराज्य संस्था’ अथवा ‘पंचायत राज’ची निवडणूक लढवता येणार नाही. निवडणूक लढवण्यासाठी पाल्य शाळेत असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
  • राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) याबाबत देशातील सर्व राज्यांना पत्र पाठवून निवडणूक नियमांमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे. आयोगाच्या सूूचनेनुसार, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला त्याचे पाल्य शाळेत जात असल्याचे आणि नियमित उपस्थित असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. ज्या उमेदवारांच्या मुलाचे वय ६ ते १४ वर्षांच्या दरम्यान आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
  • शाळाबा मुलांना प्रेरणा देण्यासाठी प्रत्येक राज्याने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक नियमांमध्ये दुरुस्ती करावी. यामध्ये ज्या उमेदवारांची मुले ६ ते १४ वर्षांच्या दरम्यान आहे, त्यांनी आपले पाल्य शाळेत दाखल केले असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र सादर करावे, असे आयोगाने राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
  • कोटय़वधी मुले शिक्षणापासून वंचित
  • बालशिक्षण हक्क अधिकार (२००९) नुसार, ६ ते १४ वर्षांच्या प्रत्येक मुलाला मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिकार आहे. मात्र आजही देशातील कोटय़वधी मुले शाळेपासून वंचित आहे. नवीन नियमांमुळे उमेदवारांची शाळेशी असणारी जवळीक वाढेल आणि शाळेतील समस्याही समजून घेण्यास मदत होईल. मुलांना त्यांचा मोफत शिक्षणाचा अधिकार नाकारल्यास घटनेला विरोध केल्यासारखेच आहे, असे प्रियांक कानुंगो यांनी म्हटले आहे.

  • 🔹नोएडाच्या स्टेडियमला आयसीसीकडून मान्यता
  • आयसीसीने ग्रेटर नोएडा येथील शहीद विजयसिंह पथिक क्रिकेट स्टेडियमला आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या आयोजनासाठी मान्यता दिली असल्याचा दुजोरा भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी दिला.
  • बीसीसीआयने म्हटले, ‘आयसीसीने सर्वात आधी डिसेंबर २0१५ मध्ये स्टेडियमची पाहणी केली होती आणि त्यावेळी फक्त असोसिएट सदस्यांच्या सामन्यांचे आयोजनास मान्यता मिळाली होती. या स्टेडियममध्ये अतिरिक्त सुविधा दिली गेली. ज्यामुळे पूर्ण सदस्यांचे सामने येथे खेळले जाऊ शकतील. गेल्या आठवड्यात आयसीसीने स्थळाचे निरीक्षण केले पूर्ण सदस्यांच्या सामन्यासाठी आवश्यक बाबी पूर्ण झाल्या. नतीजतन, ग्रेटर नोएडाचे एस.व्ही.एस.पी. क्रिकेट स्टेडियमला पूर्ण सदस्यीय संघांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाची स्वीकृती मिळाली आहे.’
  • आयसीसीने दिलेल्या मान्यतेविषयी आनंद व्यक्त करताना बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर म्हणाले की, ग्रेटर नोएडा येथील एसपीएसपी क्रिकेट स्टेडियम पूर्ण सदस्यांच्या आंतराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी पात्र असल्याची घोषणा करताना मला आनंद वाटतोय.
  • बीसीसीआय २३ आॅगस्ट ते १४ सप्टेंबर २0१६ दरम्यान दिवस-रात्र स्वरूपात गुलाबी चेंडूवर दुलीप करंडक सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामुळे पायाभूत सोयी आणि सुविधांची चाचणी करता आली.’
  • #eMPSCkatta_Current_Affairs
  • 🔹शिवा केशवनला आशियाई स्पर्धेत सुवर्ण
  • ट्रेनिंगच्या वेळी छोटासा अपघात झाल्याने तयारीवर परिणाम झाला असला तरी भारताचा वेळचा हिवाळी ऑलिम्पियन शिवा केशवनने नागानो, जपान येथे झालेल्या आशियाई ल्युज चॅम्पियनशिपमध्ये शानदार प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकावले.
  • केशवनने या स्पर्धेत पूर्ण वर्चस्व गाजवत प्राथमिक फेरीतील दोन रेस 1 मि. 39.962 सेकंदात पूर्ण केली आणि 130.4 किमी प्रतितास असा सर्वोच्च वेग नेंदवला. जपानच्या तनाका शोहेइने दुसरे (1:44.874 से. व 124.6 किमी / तास) स्थान मिळविले तर चिनी तैपेईच्या लिएन टे ऍनने कांस्य (1:45.120 से. व 126.3 किमी/तास) मिळविले.
  • या स्पर्धेची तयारी करताना सरावावेळी 130 किमी वेगात स्लेड (घसरगाडी) क्रॅश झाले आणि ते मोडले. याशिवाय त्याच्या डाव्या पावलाच्या स्नायुनाही दुखापत झाली. त्यामुळे अधिकृत टेनिंगचा बराचसा भाग त्याला हुकला होता. त्यावर मात करीत मुख्य स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळविण्यापर्यंत मजल मारण्याचा पराक्रम केला. या वर्षाच्या प्रारंभीच्या काळात त्याला 2016 विश्व अजिंक्यपद स्पर्धेतून निधीअभावी माघार घ्यावी लागली होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Wikipedia

खोज नतीजे

Comments System