- भारतीय युवा संघ आशिया 'चॅम्पियन' :
- फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताच्या युवा संघाने श्रीलंकेचा 34 धावांनी पराभव करून 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली.
- आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 273 धावांची समाधानकारक मजलम मारली.
- तसेच या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ यजमान श्रीलंकेचा संघ 39.5 षटकात 4 बाद 196 धावा अशा सुस्थितीत होता.
- मात्र, भारताच्या गोलंदाजांनी मोक्याच्यावेळी अचूक मारा करताना लंकेच्या फलंदाजांना जखडवून ठेवत त्यांचा डाव 48.4 षटकांत 239 धावांमध्ये संपुष्टात आणला.

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या क्रमवारी जाहीर :
- आशियाई स्पर्धेतील माजी सुवर्ण विजेता विकास कृष्ण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाच्या (एआयबीए) जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीमध्ये चौथ्या स्थानी आहे.
- विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य विजेती साविती बुरा दुसऱ्या स्थानी आहे.
- एआयबीए व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये वर्षांतील सर्वोत्तम बॉक्सर ठरलेल्या विकासने 75 किलो वजनी गटात 1350 मानांकन गुणांची कमाई केली आहे.
- पुरुष बॉक्सिंगमध्ये शिवा थापा 56 किलो गटात सातव्या स्थानी आहे. भारताचा एल देवेंद्रो सिंग लाईट फ्लायवेट (49 किलो) गटात 27व्या स्थानी आहे.
- राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेता मनोज कुमार लाईट वेल्टरवेट (64 किलो) गटात 36व्या स्थानी आहे.

उदित नारायण यांना मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर :
- एका पेक्षा एक दर्जेदार गाण्यांना संगीतबद्ध केलेल्या भारतीय सिने इतिहासातील पहिल्या महिला संगीतकार उषा खन्ना यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार जाहीर.
- तसेच ख्यातनाम गायक उदित नारायण यांनाही हा पुरस्कार प्रदान करणार आहे.
- अॅड. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव आणि मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.
- पुरस्काराचे हे नववे वर्ष असून एक लाख रूपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल, श्रीफळ असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असते तर 51 हजार रूपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप असते.

राजमुद्रेचे चित्रकार दिनानाथ भार्गव यांचे निधन :
- राजमुद्रेच्या निर्मितीत मोलाचा वाटा असलेले प्रख्यात चित्रकार दिनानाथ भार्गव यांचे इंदूरमध्ये 24 डिसेंबर रोजी निधन झाले. ते 89 वर्षांचे होते.
- भार्गव हे एक दशकाहून अधिक काळ हृदयासंबंधी विकारांनी ग्रस्त होते. त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टीही करण्यात आली होती.
- 1 नोव्हेंबर 1927 रोजी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलताई येथे भार्गव यांचा जन्म झाला होता.
- कला भवन शांती निकेतनचे कलागुरु नंदलाल बोस यांच्या प्रिय शिष्यांपैकी ते एक होते. बोस यांनीच भारतीय संविधानातील पांडुलिपीची पाने तयार करण्यासाठी भार्गव यांची निवड केली होती.
- कपड्यांमधील प्रसिद्ध मधुबनी पेंटींग ही त्यांचीच देणगी होती. त्यांच्या वॉश पेंटींग चित्रकला जगतात प्रसिद्ध होती.
- 1950 च्या दशकात युरोपमधील वर्ल्ड आर्ट टूरमध्येही त्यांच्या चित्रांचा समावेश करण्यात आला होता. या चित्रांसाठी त्यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते.

गोवा येथील आयआयटी संचालकपदी बर्दकांत मिश्रा :
- उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात स्वतःचे खास स्थान निर्माण करणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांपैकी (आयआयटी) गोव्यासह पाच नव्या संस्थांच्या रिक्त पदांवर संचालकांची नियुक्ती करण्यात आली.
- गोवा आयआयटीच्या संचालकपदी बर्दकांत मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. या पाचही आयआयटी संस्था या वर्षीपासूनच अस्तित्वात आल्या आहेत.
- आयआयटी संचालकपद हे प्रतिष्ठेचे मानले जाते. देशात 23 आयआयटी आहेत. यापैकी गोवा, धारवाड, भिलाई, गोवा, जम्मू व धनबाद आयआयटी याच वर्षी अस्तित्वात आल्या आहेत.
- पलक्कड व तिरुपती येथील संस्था 2015 मध्ये सुरू झाल्या. यातील जम्मू वगळता इतर सर्व संचालकांची नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या नियुक्त्यांच्या अंतिम आदेशांवर स्वाक्षरी केली.
- नव्या संचालकांची नावे अशी (एस. पासुमासुथू (धारवाड), बर्दकांत मिश्रा (गोवा), के.एन. सत्यनारायण, रजत मोना (भिलई) व पी. बी. सुनीलकुमार (पलक्कड) आहेत.
- स्वातंत्र्योत्तर काळात तंत्रशिक्षणाला वाव देण्यासाठी नेहरू सरकारने आयआयटीची पायाभरणी केली. रुरकी येथे 1947 मध्ये भारतातील पहिल्या आयआयटीची पायाभरणी झाली.
- 50 च्या दशकात मुंबई व खरगपूरसह आणखी चार आणि 1961 मध्ये दिल्ली आयआयटीची स्थापना करण्यात आली.
- 🔹अंडर १९ आशिया कप, श्रीलंकेवर मात करत भारताने पटकावले विजेतेपद

- भारताने श्रीलंकेवर मात करत अंडर १९ आशिया चषकावर नाव कोरले आहे. भारताचा कर्णधार अभिषेक शर्माच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने लंकेवर ३४ धावांनी विजय मिळवला असून या कामगिरीसाठी शर्माला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.
- श्रीलंकेत अंडर-१९ आशिया चषक पार पडले. शुक्रवारी संध्याकाळी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ८ गडी गमावत २७३ धावा केल्या. हिमांशू राणाने ७१ तर शुभम गिलने ७० धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. कर्णधार अभिषेक शर्माने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन २९ धावांची खेळी केली. सलमान खान २६ धावांवर बाद झाला त्यावेळी भारत ५ बाद २४४ धावांवर होता. मात्र त्यानंतर प्रियम गर्ग आणि हेत पटेल हे दोघेही लागोपाठ बाद झाल्याने भारताची अवस्था ७ बाद २४५ अशी झाली. तळाचा फलंदाज कमलेश नागरकोटीने २३ धावांची महत्त्वाची खेळी करत भारताला २७३ धावांची मजल गाठून दिली.
- घरच्या मैदानात खेळणा-या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात फारशी चांगली नव्हती. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेची सलामीची जोडी संघाच्या २७ धावा झाल्या असतानाच फोडली. मात्र त्यानंतर रेवेन केलीने ६२ आणि तिस-या क्रमांकावर आलेल्या हासिथ बोयागोडाने ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी जमली असताना कर्णधार अभिषेक शर्माने भारताला मोठे यश मिळवून दिले. शर्माने बोयागोडाला बाद करत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. यानंतर शर्माने अर्धशतक ठोकणा-या कामिंदू मेडिंसचीही विकेट घेतली. शर्माने ३७ धावांमध्ये ४ विकेट घेतल्या. तर राहुल चाहरने तीन विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांच्या अचूक मा-यापुढे श्रीलंकेचा संघ २३९ धावांवर गारद झाला. सामन्यात २९ धावा आणि ४ विकेट घेणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. तर हिमांशू राणाला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
- 🔹ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन
- ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी संध्याकाळी निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. बेनवाडा, येळकोट, आडवाटा, वारसदार हे त्यांचे कथासंग्रह वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. दलित साहित्यात त्यांचे मोलाचे योगदान असून आंबेडकर चळवळीतही ते सक्रीय होते.
- वामन होवाळ यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. होवाळ यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी ठाणे आणि नंतर सिद्धार्थ महाविद्यालयात घेतले. शालेय जीवनापासून त्यांनी कथालेखन केले. त्यांची पहिली कथा पुण्यातील एका मासिकात छापून आली. यानंतर त्यांच्या विविध मासिकांमधून ३५० हून अधिक कथा प्रसिद्ध झाल्या.
- दलित- शोषितांचे विदारक जग मांडत असताना आणि समाज परिवर्तनासाठी झटत असतानाही होवाळ यांचे लेखन हे प्रचारकी नसल्याचे नेहमीच सांगितले जायचे. दलित साहित्याला वामन होवाळ यांच्या लेखणीने नवी उंची गाठून दिली. होवाळ यांच्या कथा मराठी भाषेसोबतच अन्य भाषांमध्ये गाजल्या. हिंदी, इंग्रजीपासून ते अगदी उर्दू, कन्नड आणि फ्रेंच भाषेतही त्यांच्या कथा अनुवादित झाल्या आहेत.
- होवाळ यांचे बेनवाड, येळकोट, वारसदार, वाटा आडवाटा आणि ऑडिट हे कथासंग्रह प्रसिद्ध होते. यातील तीन कथासंग्रहांना पुरस्कारही मिळाला होता. यात राज्य सरकारच्या पुरस्काराचा समावेश आहे. ‘आमची कविता’ या कविता संग्रहाचेही त्यांने संपादन केले होते.
- शुक्रवारी संध्याकाळी विक्रोळी येथील राहत्या घरी वामन होवाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वामन होवाळ यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. होवाळ यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
- 🔹महाराष्ट्रातील ४.१५ लाख गरीब कुटुंबे धुरापासून मुक्त
- गरिबाच्या स्वयंपाकघरात नि:शुल्क एलपीजी कनेक्शन उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ४.१५ लाख कुटुंबीयांची स्वयंपाकघरे धूररहित झाली आहेत.
- पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) धर्मेंद्र प्रधान यांच्या पुढाकाराने मंत्रालयाने धडक कार्यक्रम हाती घेतला असून देशभरातील दारिद्र रेषेखाली राहणाऱ्या ५ कोटी कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत सर्वाधिक अर्ज पुणे येथून आले, पण कनेक्शन मिळण्यात लातूर आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील १४ लाख गरीब कुटुंबांनी अर्ज केले. पैकी १०.८६ लाख अर्ज मंजूर करण्यात आले. यापैकी ४ लाख १५ हजार कुटुंबाकडे गॅस कनेक्शन पोहोचवून देण्यात आले.
- सर्वाधिक अर्ज पुणे (७८,७५७), सोलापूर (७६,७४४), नांदेड (७२,८५९), नाशिक (७१,३७३) आणि अहमदनगर (७०,०५२) या जिल्ह्यातील लोकांनी केले. अर्जाच्या तुलनेत सर्वाधिक गॅस कनेक्शन लातूर (२९,४४३), सांगली (१७,७८७), अहमदनगर (१७,४६६), धुळे (१७,६३२) आणि पुणे (१७४६६) या जिल्ह्यातील लोकांना देण्यात आले. तसेच नागपूर येथे ३१,७२६ लोकांनी अर्ज भरले. पण १२,२१८ कुटुंबाला कनेक्शन देण्यात आले तर औरंगाबाद येथे ३७,१८८ अर्जापैकी ११,८०७ लोकांना कनेक्शन मिळाले. मंजूर झालेल्या अर्जदारास काही महिन्यातच कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
- घरगुती गॅस कनेक्शनमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. यावर्षी आॅक्टोबरपर्यंत ८१ टक्के कुटुंबाकडे घरगुती गॅस कनेक्शन आहे. एकूण २.३८ कोटी कुटुंबांपैकी २.०९ कोटी कुटंब गॅसवर स्वयंपाक करतात.
- ६०० जिल्हा नोडल अधिकारी
- संपूर्ण देशात जिल्हास्तरावर ६०० नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना या योजनेचा कणा समजला जात आहे. अधिकाऱ्यानुसार ते फिल्ड काम करतात. ते अर्जदार व गॅस वितरणादरम्यान समन्वयाचे काम करताना योजनेच्या अन्य पैलूंवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.
- 🔹दक्षिण सॅन फ्रान्सिस्को शहराचा महापौर बनला भारतीय अभियंता
- वॉशिंग्टन :
- अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात स्थित दक्षिण सॅन फ्रान्सिस्को सिटीत भारतीय अमेरिकन अभियंता महापौर म्हणून निवडून आला आहे. आयआयटी चेन्नईचे विद्यार्थी असणारे प्रदीप गुप्ता यांनी शहराच्या महापौरपदाची शपथ घेतली आहे.
- कोणत्याही अमेरिकन शहरासाठी महापौर म्हणून निवडून आलेले ते दुसरे भारतीय व्यक्ती आहेत. मी माजी महापौर मार्क एड्डिगो यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेले काम सुरू ठेवेन, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्यचे गुप्ता यांनी म्हटले. 31 डिसेंबर 2012 रोजी एक वर्षासाठी दक्षिण सॅन फ्रान्सिस्को नगर परिषदेत गुप्ता यांना नियुक्त करण्यात आले होते. नगर परिषदेसाठी त्यांच्या नियुक्तीआधी ते 3 वर्षांसाठी दक्षिण सॅन फ्रान्सिस्को नियोजन आयोगात अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गुप्ता यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डॉक्टरेट केले आहे. अमेरिका आणि इतर देशांमध्ये इलेक्ट्रिकल यूटिलिटी क्षेत्रासोबत गुप्ता यांची 30 वर्षांपेक्षा अधिक काळाची कारकीर्द राहिली आहे.
- याआधी ते शहराचे उपमहापौर देखील राहिले आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें